जालना : निवडणुकीच्या काळात अनेकजण आपल्या नावाचा वापर करून पैसे गोळा करण्याची शक्यता आहे. परंतु खबरदार! माझ्या नावावर पैसे गोळा कराल तर याद राखा!', असा सज्जड दम मनोज जरांगे पाटील यांनी पदाधिकारी आणि इच्छुकांना दिलाय. अंतरवालीत गुरुवारी इच्छुक उमेदवारांची महत्त्वाची बैठक होणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.