Tuesday, December 10, 2024 09:53:37 AM

Manoj Jarange
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचे जाहीर केले.

मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचे जाहीर केले. निवडणुकीत उमेदवार उभे करणार नाही असे त्यांनी जाहीर केले. ज्यांनी उमेदवारी अर्ज केला आहे त्यांनी माघार घ्यावी, असे निर्देश जरांगेंनी दिले. माघारीची घोषणा करताना एकाच जातीवर निवडणूक लढणं शक्य नाही अशी कबुली जरांगेंनी दिली. 

याला पाड, त्याला पाड ही आपली भूमिका नाही... कुणालाही पाडा,कुणालाही निवडून आणा... ही माघार नाही, गनिमी कावा आहे... असे मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. 

मतदारसंघानुसार सविस्तर चर्चा केली. पहाटे साडेतीन पर्यंत चर्चा सुरू होती. पण मित्रपक्षांची यादी अद्याप आलेली नाही. यामुळे माघारीचा निर्णय घेतल्याचे जरांगेंनी जाहीर केले.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo