मुंबई : शिउबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर म्हणजेच मातोश्रीबाहेर मराठा समाज आंदोलन करणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यावर आपल्या भूमिका स्पष्ट करा या मागणीसाठी २०० मराठा आंदोलक आंदोलन करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.