Saturday, March 07, 2026 02:18:15 AM

The 50 Winner : 'लायन'च्या महालात मराठमोळा डंका! 'द 50' शोचा पहिला विजेता ठरला शिव ठाकरे?

'द 50' या शोमध्ये एकूण 50 दिग्गज स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातील अंतिम फेरीसाठी शिव ठाकरे, मिस्टर फैजू, अमर काका आणि कृष्णा श्रॉफ या टॉप 4 स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळाली.

the 50 winner  लायनच्या महालात मराठमोळा डंका द 50 शोचा पहिला विजेता ठरला शिव ठाकरे

The 50 Winner : मराठमोळा अभिनेता आणि 'बिग बॉस मराठी 2'चा विजेता शिव ठाकरे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नवीन रिअलिटी शो 'द 50' (The 50) च्या सेटवरून लीक झालेल्या माहितीनुसार, शिव ठाकरेने या शोच्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद आपल्या नावे केले असून त्याने आपल्या एका चाहत्याला 50 लाख रुपये मिळवून दिले आहेत. 19 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईत या शोचा ग्रँड फिनाले पार पडला असून सोशल मीडियावर विजयाचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

असा रंगला ग्रँड फिनालेचा थरार
'द 50' या शोमध्ये एकूण 50 दिग्गज स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातील अंतिम फेरीसाठी शिव ठाकरे, मिस्टर फैजू, अमर काका आणि कृष्णा श्रॉफ या टॉप 4 स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळाली. रजत दलाल पाचव्या स्थानावर बाद झाल्याने विजेतेपदाची लढत अधिक तीव्र झाली. फिनालेमध्ये एक कठीण 'पझल' (कोडे सोडवण्याचे) टास्क देण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शिव ठाकरेने हे कोडे अवघ्या 10 मिनिटांत सोडवून सर्वांना चकित केले आणि बाजी मारली.

प्रिन्स नरुलाचा मोठा त्याग
या शोमध्ये रिअलिटी किंग प्रिन्स नरुलाने 'तिकीट टू फिनाले' जिंकले होते. मात्र, त्याने स्वतःचा हक्क सोडून आपली जागा आपला जवळचा मित्र शिव ठाकरेला दिली. "शिव माझा भाऊ आहे आणि त्याने हा शो जिंकावा अशी माझी इच्छा आहे," असे म्हणत प्रिन्सने शिवला फायनलमध्ये पोहोचवले. प्रिन्सच्या या दातृत्वामुळेच शिवला फिनालेमध्ये खेळण्याची आणि विजेतेपद मिळवण्याची संधी मिळाली, अशी चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.

हेही वाचा - M M Baig Death : धक्कादायक! राहत्या घरात ज्येष्ठ दिग्दर्शकाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत; चार दिवसांनी उघडकीस आली घटना

रिअलिटी शोचा नवा बादशाह
शिव ठाकरेसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 'बिग बॉस मराठी 2' जिंकल्यानंतर त्याने 'रोडीज', 'खतरो के खिलाडी' आणि 'झलक दिखला जा' यांसारख्या मोठ्या शोमध्ये आपली छाप पाडली होती. मात्र, हिंदी 'बिग बॉस 16' मध्ये तो उपविजेता (First Runner-up) ठरला होता. आता 'द 50' सारखा मोठा शो जिंकून त्याने पुन्हा एकदा आपण रिअलिटी शोचा 'किंग' असल्याचे सिद्ध केले आहे. त्याच्या या यशामुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा केला जात आहे.

फिनाले कधी प्रसारित होणार?
जरी फिनालेचे चित्रीकरण पूर्ण झाले असले आणि शिवच्या विजयाच्या बातम्या लीक झाल्या असल्या, तरी निर्मात्यांनी सस्पेन्स कायम ठेवण्यासाठी चारही फायनलिस्टसोबत विजयाचे क्षण शूट केले आहेत. या शोचा ग्रँड फिनाले अधिकृतपणे 22 मार्च 2026 रोजी कलर्स टीव्ही (Colors TV) आणि जिओ हॉटस्टार (JioHotstar) वर प्रसारित केला जाईल. त्याच दिवशी शिव ठाकरेला अधिकृतपणे विजेता घोषित केले जाईल.

हेही वाचा - The Kerala Story 2 Controversy: 'द केरला स्टोरी 2' चित्रपटाला कोर्टाचा दणका; प्रदर्शनापूर्वीच केंद्र आणि निर्मात्यांना हायकोर्टाची नोटीस


सम्बन्धित सामग्री