Thursday, March 20, 2025 07:31:26 PM

मास्टरमाइंड वाल्मिकला 15 दिवसांची पोलीस कोठडी

वाल्मिकला 15 दिवसांची पोलीस कोठडी. केज कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. खंडणी आणि हत्याप्रकरणाचं कनेक्शन. सीआयडीच्या अधिकाऱ्यांचा दावा

मास्टरमाइंड वाल्मिकला 15 दिवसांची पोलीस कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला वाल्मिकला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. वाल्मिक कराड स्वतःहून पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाला. त्यांनतर त्याला कोर्टात हजार करण्यात आले. यावेळी केज कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल समोर आलाय. खंडणी आणि हत्याप्रकरणाचं कनेक्शन असल्याचा दावा सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केला असून वाल्मिकला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

कोण आहे वाल्मिक कराड ?
वाल्मिक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या घरी कामाला होता. 
त्याचदरम्यान वाल्मिकची धनंजय मुंडेंचे वडील पंडित मुंडे यांच्याशी जवळीक 
२००९मध्ये  धनंजय मुंडेंच्या विधानसभा उमेदवारीसाठी कराडचा हट्ट 
त्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा मित्र बनला . 
मुंडे कुटुंबात फूट पडल्यावर कराड धनंजय मुंडेसोबत गेला 
वाल्मिक कराड परळीत विद्यानगर शाखेतून नगरसेवक बनला 
कराड हा परळी नगरपालिकेचा प्रभारी नगराध्यक्ष 
१५ वर्षे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत कराडने धनंजय मुंडेंचा कारभार पाहिलाय. 
२५ वर्षात कराडवर एकूण १४ गुन्हे दाखल 
कराडवर खंडणी, फसवणूक, मारामारीसह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा 
कराडवर मस्साजोगमधील पवनऊर्जा कंपनीकडे २ कोटींची खंडणी मागितल्याने गुन्हा 
कराड मस्साजोगमधील प्रकरणानंतर फरार 

संतोष देशमुख हत्येचा घटनाक्रम 
९ डिसेंबर - सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या 
धनंजय देशमुखांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा 
१० डिसेंबर - आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको 
११ डिसेंबर - क्राईम ब्रांचकडून प्रतीक घुलेला पुण्याच्या रांजणगावातून अटक 
११ डिसेंबर - कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर केज पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल 
१३ डिसेंबर - बीड बंदची हाक 
१३ डिसेंबर - हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग
१४  डिसेंबर - केजचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाजनांना सक्तीच्या रजेवर पाठवलं 
१४  डिसेंबर - आरोपी विष्णू चाटेची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी 
हिवाळी अधिवेशनात देशमुख हत्येचे पडसाद 
१८ डिसेंबर - विष्णू चाटेला अटक 
१९ डिसेंबर - संतोष देशमुखांचा शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त 
२१ डिसेंबर - पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली 
२१ डिसेंबर - नवे पोलीस अधीक्षक कॉवतांची नियुक्ती 
२१ डिसेंबर - शरद पवार, अजित पवारांनी देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट 
२४ डिसेंबर - खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे 
२८ डिसेंबर - बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा 
आतापर्यंत सीआयडीकडून १५० हुन अधिक जणांची चौकशी 
 ३१ डिसेंबर - वाल्मिक कराडची पुण्यात शरणागती 


सम्बन्धित सामग्री