Donald Trump Noble Memes : या वर्षाच्या नोबेल शांतता पुरस्काराची (Nobel Peace Prize 2025) घोषणा झाली आहे आणि या घोषणेने पुन्हा एकदा मोठी चर्चा घडवून आणली आहे. यंदा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना हा सन्मान मिळाला नाही, ज्या पुरस्कारासाठी ते दीर्घकाळापासून उघडपणे लॉबिंग करत होते. (अर्थात तेव्हाही त्यांना कोणी गांभीर्याने घेत नव्हते किंवा त्यांना नोबेल मिळेल अशी कोणाला सुतराम शक्यता वाटत नव्हती. पण काहींनी अशी शक्यता व्यक्त केली होती की, टॅरिफच्या हट्टाप्रमाणे ट्रम्प यांचा हा नोबेलसाठीचा 'राजहट्ट' पुरवला जातो की काय..)
पण मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचे नोबेल मिळाले ही बातमी समोर येताच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर ट्रम्प यांच्याविषयीचे अनेक मजेदार मीम्स (Memes) वेगाने व्हायरल होऊ लागले. हा प्रतिष्ठित पुरस्कार व्हेनेझुएलाच्या लोकशाही समर्थक नेत्या मारिया कोरिना मचाडो (Maria Corina Machado) यांना जाहीर करण्यात आला.
लोकशाहीसाठी लढणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांना सन्मान
मारिया कोरिना मचाडो यांना त्यांच्या हुकूमशाहीविरुद्धच्या संघर्षासाठी आणि लोकतांत्रिक मूल्यांच्या रक्षणासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. व्हेनेझुएलामध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणले गेले आहेत. नोबेल समितीने मारिया कोरिना मचाडो यांना हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या जनतेच्या लोकतांत्रिक हक्कांसाठी केलेल्या अथक संघर्षासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे शांततापूर्ण बदलाच्या प्रयत्नांसाठी दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा दावा केला होता की, त्यांनी आठ मोठी युद्धे थांबवण्यात आणि इस्त्राईल-हमास यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एवढेच नाही, तर ट्रम्प यांनी या वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य युद्ध टाळल्याचाही दावा केला होता. अशा अनेक दाव्यानंतरही ट्रम्प यांच्या हाती काहीही लागले नाही, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांची खूप खिल्ली उडवण्यात आली. 'ये तो बहुत बुरा हुआ…' अशा प्रतिक्रियांसह मजेदार पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.
हेही वाचा - UP Weird News : 'माझी बायको रात्री 'नागीण' बनते अन्...'; पतीच्या विचित्र तक्रारीने अधिकारी चक्रावले
कोण आहेत मारिया कोरिना मचाडो?
7 ऑक्टोबर 1967 रोजी जन्मलेल्या मारिया कोरिना मचाडो या व्यवसायाने इंडस्ट्रियल इंजिनियर (Industrial Engineer) आहेत आणि 'वेंते व्हेनेझुएला' (Vente Venezuela) पक्षाच्या नेत्या आहेत.
राजकीय प्रवास: त्यांनी 'सुमाते' (Sumate) नावाच्या एका नागरिक संघटनेची सह-स्थापना केली, जी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी काम करते. यातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
संसदेतील भूमिका: 2010-2015 च्या निवडणुकांमध्ये त्या नॅशनल असेंब्लीच्या (National Assembly) सदस्य म्हणून निवडून आल्या आणि सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळवणाऱ्या नेत्या ठरल्या. 2011 ते 2014 पर्यंत त्या संसदेत सक्रिय राहिल्या आणि तेव्हापासून व्हेनेझुएलाच्या विरोधी राजकारणातील एक प्रमुख चेहरा बनून आहेत.
हेही वाचा - Fox Eyes Surgery : शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीनंतर ब्राझीलियन इन्फ्लुएन्सरचा मृत्यू; डॉक्टरवर आधीच केला होता खटला दाखल