नवी दिल्ली : Microsoft ने Windows 11 वापरणाऱ्यांसाठी एक भन्नाट गिफ्ट दिलं आहे. कंपनीने शुक्रवारी नवीन Insider Preview Update (Build 26220.7051) जारी केलं आहे, आणि यात काही भन्नाट नवे फीचर्स जोडले गेले आहेत. यातील सर्वात लक्षवेधी फीचर म्हणजे ‘Ask Copilot’, जे आता टास्कबारवरून थेट वापरता येणार आहे. आतापर्यंत तुम्हाला Copilot वापरण्यासाठी वेगळं विंडो उघडावं लागायचं, पण आता फक्त एक क्लिक करा आणि Copilot तुमच्या सेवेत हजर! या फीचरमुळे तुम्ही Copilot शी थेट व्हॉइस किंवा मजकूराद्वारे संवाद साधू शकता. म्हणजेच, तुम्हाला काही विचारायचं असेल, फायली शोधायच्या असतील किंवा सेटिंग बदलायची असेल आता सगळं Copilot करेल.
हे फीचर वापरणं अगदी सोपं आहे. तुम्हाला फक्त Settings → Personalisation → Taskbar → Ask Copilot या पर्यायावर जाऊन फीचर सुरू करावं लागेल. Microsoft ने सांगितलं आहे की हे Windows APIs वापरतं, त्यामुळे Copilot तुमच्या फाईल्स आणि अॅप्स पटकन शोधू शकतो. पण चांगली बातमी म्हणजे हे फीचर तुमची वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवतं, त्यामुळे प्रायव्हसीबद्दल काळजी करण्याची गरज नाही. याचबरोबर Microsoft ने गेमिंग प्रेमींसाठीही मोठी भेट दिली आहे. कंपनीने आता Full-Screen Experience (FSE) फीचर आणखी वाढवलं आहे. आधी हे Asus ROG, Xbox आणि Ally सारख्या हँडहेल्ड डिव्हाइसवर उपलब्ध होतं, पण आता हे फीचर MSI Claw सारख्या इतर Windows 11 गेमिंग लॅपटॉपमध्येही मिळणार आहे. यामुळे गेमिंग दरम्यान टास्क स्विचिंग जलद होईल, परफॉर्मन्स सुधारेल आणि गेमप्ले अधिक स्मूथ बनेल.
हेही वाचा: PM Kisan 21st Installment: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार
आता बोलूया सगळ्यात मजेशीर फीचरबद्दल Shared Audio (Preview)! या फीचरमुळे दोन वेगवेगळे युजर्स एकाच वेळी एकच गाणं किंवा व्हिडिओचा साउंड ऐकू शकतील. म्हणजे तुम्ही आणि तुमचा मित्र दोघेही एकाच वेळेस एकाच ऑडिओचा आनंद घेऊ शकता. हे फीचर Bluetooth Low Energy (LE) Audio तंत्रज्ञानावर चालतं आणि सध्या Copilot+ PCs वर उपलब्ध आहे.
यासाठी तुम्हाला फक्त Quick Settings → Shared Audio (Preview) मध्ये जाऊन दोन Bluetooth डिव्हाइसेस कनेक्ट करायचे आणि “Share” बटण दाबायचं — आणि झालं! दोन्ही हेडफोनमध्ये एकाच वेळी आवाज ऐकू येईल. Microsoft सतत Windows 11 ला अधिक स्मार्ट, इंटरॅक्टिव्ह आणि युजर-फ्रेंडली बनवण्यासाठी काम करत आहे. ‘Ask Copilot’ आणि ‘Shared Audio’ हे फीचर्स दाखवतात की आता विंडोज फक्त एक ऑपरेटिंग सिस्टम नाहीये, तर तुमचा डिजिटल साथीदार सुद्धा आहे.
हेही वाचा: Priyanka Gandhi: प्रियांका गांधींचा संताप , म्हणाल्या “दरवर्षी दिल्लीकरांना विषारी हवेत जगावं लागतं”