Wednesday, December 11, 2024 06:28:11 PM

Modi
आंतरराष्ट्रीय अभिधम्म परिषदेत पंतप्रधान मोदी उपस्थित

नवी दिल्लीत गुरुवारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवस तसंच पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल होणाऱ्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय अभिधम्म परिषदेत पंतप्रधान मोदी उपस्थित

नवी दिल्ली : नवी दिल्लीत गुरुवारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवस तसंच पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल होणाऱ्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. अभिधम्माचं ज्ञान मिळाल्यानंतर भगवान बुद्ध यांच्या अवतरणाच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. अलीकडेच, पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे ह्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. याचे कारण अभिधम्मचे सगळे उपदेश, पाली भाषेत उपलब्ध आहेत. भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. जगभरातल्या १४ देशांचे विद्वान आणि अभ्यासक या परिषदेत सहभागी झाले होते.

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo