Wednesday, December 11, 2024 11:38:42 AM

BJP
मोदी, शाह, योगींच्या महाराष्ट्रात ४३ सभा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तीन स्टार प्रचारक ४३ सभा घेणार आहेत.

मोदी शाह योगींच्या महाराष्ट्रात ४३ सभा

नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तीन स्टार प्रचारक ४३ सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आठ सभा घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २० तर योगी आदित्यनाथ १५ सभा महाराष्ट्रात घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रात सर्वाधिक प्रचारसभा घेणार आहेत. 

भाजपाने महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची फौज उभारली आहे. कोणते स्टार प्रचारक कुठे सभा घेणार याचे सविस्तर वेळापत्रक भाजपाकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे.

भाजपाचे केंद्रातील स्टार प्रचारक - २०

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी
  2. भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे.पी. नड्डा
  3. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
  4. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
  5. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी
  6. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
  7. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
  8. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल
  9. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई
  10. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव
  11. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा
  12. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी
  13. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा
  14. कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान
  15. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
  16. माजी खासदार स्मृती इराणी
  17. भाजपाचे संयुक्त राष्ट्रीय सरचिटणीस शिव प्रकाश
  18. पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव
  19. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
  20. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल

भाजपाचे महाराष्ट्रातील स्टार प्रचारक - २०

  1. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
  2. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे
  3. महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
  4. माजी खासदार रावसाहेब दानवे
  5. राज्यसभा खासदार अशोक चव्हाण
  6. खासदार उदयनराजे भोसले
  7. खासदार नारायण राणे
  8. विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे
  9. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
  10. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार
  11. वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
  12. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
  13. ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन
  14. वैद्यकीय शिक्षण मंत्री रविंद्र चव्हाण
  15. विधान परिषदेच्या आमदार प्रवीण दरेकर
  16. राज्यसभा खासदार अमर साबळे
  17. नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) मुरलीधर मोहळ
  18. माजी खासदार अशोक नेते
  19. माजी आमदार डॉ. संजय कुटे
  20. माजी खासदार नवनीत राणा

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo