Wednesday, November 19, 2025 02:02:32 PM

Post Office Scheme : एकदा गुंतवणूक करा आणि दरमहा मिळवा 5,500 रुपये! योजना या लोकांसाठी ठरतेय वरदान

सध्या या योजनेवर वार्षिक 7.4% व्याजदर दिला जात आहे, जो अनेक बँकांपेक्षा जास्त आहे. शिवाय, ही योजना पोस्टाची असल्यामुळे पूर्णपणे विश्वासार्ह आहे.

post office scheme  एकदा गुंतवणूक करा आणि दरमहा मिळवा 5500 रुपये योजना या लोकांसाठी ठरतेय वरदान

Post Office Scheme : आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती काही ना काही मार्गाने गुंतवणूक करून पैसे वाचवण्याचा विचार करत असतो. पोस्ट ऑफिस बचत योजना (Post Office Savings Scheme) हा अशा लोकांसाठी सर्वात पहिला आणि विश्वासार्ह पर्याय ठरतो. कारण पोस्ट ऑफिसच्या बहुतेक योजनांमध्ये जोखीम नसते, गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात आणि सरकारकडून हमी (गॅरंटी) मिळत असल्याने व्याजदरही आकर्षक असतो. पोस्ट ऑफिसच्या योजनांना गृहिणी, निवृत्त ज्येष्ठ नागरिकांची पहिली पसंती असते. त्यांच्यासह इतरांसाठीही पोस्टाची 'मासिक उत्पन्न योजना' (MIS) खूपच आदर्श ठरते.

'मासिक उत्पन्न योजना' (MIS) चे फायदे आणि नियम
ना खाही योजस करून निवृत्त ज्येष्ठ नागरिक आणि गृहिणींसाठी नियमित मासिक उत्पन्नाचा एक उत्तम स्रोत आहे. या योजनेत तुम्हाला 5 वर्षांसाठी एकरकमी पैसे जमा करावे लागतात. सध्या या योजनेवर वार्षिक 7.4% व्याजदर दिला जात आहे, जो अनेक बँकांपेक्षा जास्त आहे. तुमच्या ठेवीच्या तारखेपासून, पोस्ट ऑफिस दरमहा तुमच्या खात्यात व्याज जमा करण्यास सुरुवात करते. या योजनेत गुंतवलेली मूळ रक्कम 5 वर्षांसाठी तशीच राहते आणि तुम्हाला केवळ दरमहा व्याज मिळत राहते.

हेही वाचा - UPI Transactions: UPI झाला डिजिटल इंडियाचा ‘राजा’! ऑक्टोबरमध्ये दररोज 94,000 कोटींचे व्यवहार; सणासुदीचा हंगाम ठरला गेमचेंजर

गुंतवणुकीची मर्यादा आणि मिळणारे उत्पन्न
तुम्ही या योजनेतील गुंतवणूक 1,000 रुपयांपासून सुरू करू शकता आणि गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही एका व्यक्तीच्या नावाने खाते उघडले, तर, या ठेवीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकता. मात्र, जर तुम्ही दोन किंवा तीन लोकांसह संयुक्त खाते उघडले, तर तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवू शकता.

उदाहरणातून समजून घेऊ:
जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला दरमहा अंदाजे 3,083 रुपये व्याज मिळेल.
जर तुम्ही कमाल 9 लाख रुपये (एका खात्यात) गुंतवले, तर तुम्हाला 7.4% वार्षिक व्याजदराने दरमहा अगदी 5,550 रुपये मिळतील!
तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर अवलंबून, या योजनेच्या संपूर्ण 5 वर्षांच्या कालावधीत तुम्हाला दरमहा नियमित व्याज मिळत राहील. 5 वर्षांनंतर, तुमची संपूर्ण मूळ रक्कम (उदा. 9 लाख रुपये) तुम्हाला परत मिळेल. ही रक्कम तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता किंवा मासिक उत्पन्न मिळवत राहण्यासाठी त्याच योजनेत (MIS) पुन्हा गुंतवू शकता.

हेही वाचा - Gold prices : अमेरिकन शेअर बाजार ‘मोठ्या बुडबुड्या’त, सोन्याची वाढती किंमत ही ‘धोक्याची मोठी घंटा’ – Zoho चे संस्थापक श्रीधर वेम्बू यांचा गंभीर इशारा!


सम्बन्धित सामग्री