Tuesday, December 10, 2024 11:09:36 AM

Pune
पुण्यात शंभरी ओलांडलेले पाच हजारांपेक्षा जास्त मतदार

पुणे जिल्ह्यात शंभरी ओलांडलेले पाच हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत. यात महिला मतदारांची संख्या जास्त आहे.

पुण्यात शंभरी ओलांडलेले पाच हजारांपेक्षा जास्त मतदार

पुणे : पुणे जिल्ह्यात शंभरी ओलांडलेले पाच हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत. यात महिला मतदारांची संख्या जास्त आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण पाच हजार २३१ शंभरी ओलांडलेले मतदार आहेत. यात शंभरी ओलांडलेल्या पुरुष मतदारांची संख्या दोन हजार ५४६ आणि महिला मतदारांची संख्या दोन हजार ६८४ एवढी आहे. 

पुरुषांच्या तुलनेत शंभरी ओलांडलेल्या महिला मतदारांची संख्या १३८ ने जास्त आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, चिंचवड आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात शंभरी ओलांडलेल्या पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६५ तर मावळ विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ८१ शंभरी ओलांडलेले मतदार आहेत. 

निवडणूक आयोगाने ८५ पेक्षा जास्त वयाच्या मतदारांना घरातूनच मतदान करण्याचा पर्याय दिला होता. त्यासाठी एक हजार ९२५ मतदार पात्र ठरले आहेत. त्यांना घरातून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

  1. पुणे जिल्हा
  2. एकूण विधानसभा मतदारसंघ - २१
  3. एकूण मतदार - ८८ लाख ४९ हजार ५९०
  4. एकूण पुरुष मतदार - ४५ लाख ७९ हजार २१६
  5. एकूण महिला मतदार - ४२ लाख ४९ हजार ५६९
  6. एकूण तृतीयपंथी मतदार - ८०५
  7. शंभरी ओलांडलेले एकूण मतदार - ५ हजार २३१

शंभरी ओलांडलेले पुरुष मतदार  - २ हजार ५४६
शंभरी ओलांडलेले महिला मतदार - २ हजार ६८४

           

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo