Saturday, July 12, 2025 10:13:44 AM

मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या तयारीत

मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या तयारीत आहेत. मोटरमन ‘जादा काम’बंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या तयारीत

मुंबई : मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या तयारीत आहेत. मोटरमन ‘जादा काम’बंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. हे आंदोलन झाल्यास मध्य रेल्वेची सेवा बुधवारी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मोटरमनचा प्रशासनाच्या कारभाराबाबत असंतोष असल्याचे वृत्त आहे.

मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफ विभागात प्रशासनाच्या कारभाराबाबत असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या नवीन धोरणांना विरोध करण्यासाठी मध्य रेल्वेचे मोटरमन ‘जादा काम’करणे बंद करणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या १८१० लोकल फेऱ्या धावणाऱ्यावर मर्यादा येणार असून लाखो प्रवाशांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. मोटरमन ‘जादा काम’ करणे टाळणार आहेत. त्यांना नियोजित काम फक्त केले जाणार आहे, असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून सांगण्यात आले. त्यामुळे बुधवार किंवा गुरुवारी सकाळपासून जादा काम करणे बंद करणार आहोत असे सांगण्यात आले. मध्य रेल्वेचे मोटरमन आणि लोकल व्यवस्थापक (गार्ड) यांनी निवडून दिलेल्या समितीद्वारे केलेल्या शिफारशी लागू न करता नवीन कामकाजाचा तपशील सादर करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. 


सम्बन्धित सामग्री