Saturday, March 07, 2026 03:05:31 AM

Naresh Mhaske : '...अनेकांच्या भुवया उंचावल्या...अनेकांना पोटशूळही उठला'; एकनाथ शिंदे - राज ठाकरेंच्या भेटीवरून नरेश म्हस्केंचा टोला, राजकीय वर्तुळात खळबळ

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी एक्स पोस्ट करत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे अनेकांना पोटशूळ उठले असल्याचेही म्हटले आहे.

naresh mhaske  अनेकांच्या भुवया उंचावल्याअनेकांना पोटशूळही उठला एकनाथ शिंदे - राज ठाकरेंच्या भेटीवरून नरेश म्हस्केंचा टोला राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल, बुधवारी भेट घेत चर्चा केली. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे राज्यातील राजकारणात नवा अध्याय सुरू होतोयं का अशा चर्चांना उधाण आहे. या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी एक्स पोस्ट करत नव्या राजकीय समीकरणांची नांदी असल्याचे नमूद केले. तसेच या भेटीमुळे अनेकांना पोटशूळ उठले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हा इशारा उद्धव ठाकरेंकडे असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचे दोन्ही पक्ष एकत्र लढले होते. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीला अपयश आले असून मुंबईकरांनी महायुतीला कौर दिला. परिणामी, महापालिकेवर भाजप-सेनेचा महापौर आणि उपमहापौर विराजमान झाला. परंतू त्यानंतर राज ठाकरे शिंदेंच्या भेटीला आल्याने ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यामुळे नरे म्हस्के यांनीही उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. 

काय म्हणाले नरेश म्हस्के -

काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार @एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष @राज ठाकरे साहेब यांची भेट झाली.. अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला... परंतु, बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी  एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल!!

हेही वाचा : Rajya Sabha Election: 'आमचं संख्याबळ जास्त, मग जागाही...'; राज्यसभेच्या जागेसासाठी आदित्य ठाकरेंचा दावा


सम्बन्धित सामग्री