Saturday, January 25, 2025 07:53:21 AM

MUMBAI Central Railway Mega Block on Sunday
मध्य रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉक : वेळापत्रक पाहा

मध्य रेल्वे मुंबई विभागकडून  ८ डिसेंबर २०२४ रोजी मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. माटुंगा-मुलुंड जलद मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हार्बर मार्गावर सेवा रद्द राहतील.

मध्य रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉक  वेळापत्रक पाहा

मुंबई : मध्य रेल्वे मुंबई विभागकडून  ८ डिसेंबर २०२४ रोजी मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. माटुंगा-मुलुंड जलद मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हार्बर मार्गावर सेवा रद्द राहतील. पनवेल - कुर्ला दरम्यान विशेष सेवा सुरू राहतील. प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीसाठी सहकार्याची विनंती केली आहे. आपल्या उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. 

माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे धिम्या मार्गावर वळवल्या जातील. 

तसेच माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि त्यांच्या गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ठाणे पुढील जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. 

ठाणे येथून सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

अप आणि डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

त्याआधी ब्लॉक कालावधीत पनवेल - कुर्ला - पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी सूचना: हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम लाईन स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी मेगा ब्लॉक आवश्यक आहे. प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री