आज भुयारी मार्ग मेट्रो ३ चे काम पूर्ण झाले असून लवकरच मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CMRS) आचार्य अत्रे चौक ते कफ परेड स्थानकापर्यंत प्रवासी वाहतुकीसाठी या मार्गाच्या फेज-2B ला मान्यता दिली आहे. यासोबतच, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने घोषणा केली आहे की ९ ऑक्टोबरपासून आरे-जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) ते कफ परेड पर्यंत मेट्रो प्रवासी सेवा सुरू केली जाईल.
मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) ही मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन आहे, जी ३३.५ किलोमीटरच्या कॉरिडॉरवर २७ स्थानकांना जोडते. यामुळे दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरांपर्यंतचा प्रवास सोपा आणि सोयीस्कर होईल. एकदा ही लाईन कार्यान्वित झाली की, रस्त्यांवरील वाढता वाहतुकीचा ताण कमी होईल, लोकांचा वेळ आणि पैसा वाचेल. मुंबईकर बऱ्याच काळापासून अॅक्वा लाईन सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा - Navi Mumbai Airport: आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन; मेट्रो-3चा अंतिम टप्पाही लोकार्पित होणार; कसा असेल पंतप्रधानांचा मुंबई दौरा ?
पहिली मेट्रो सेवा आरे-जेव्हीएलआर आणि कफ परेड टर्मिनल्सवरून सकाळी ५:५५ वाजता एकाच वेळी सुरू होईल, तर शेवटची मेट्रो रात्री १०:३० वाजता धावेल आणि रात्री ११:२५ वाजता टर्मिनल स्टेशनवर पोहोचेल. मुंबई मेट्रो-३ च्या विस्तारामुळे शहराच्या वाढीला गती मिळणार नाही तर पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल देखील पडेल. या मार्गाच्या बांधकामासाठी ३७,२७० कोटी रूपये खर्च आला आहे. या मार्गावरून दररोज अंदाजे १३ लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! दिवाळीत खात्यात येणार थेट 3000 रुपये
मेट्रो अत्याधुनिक सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुविधांनी सुसज्ज आहे. कोचमध्ये वातानुकूलन, सीसीटीव्ही देखरेख आणि डिजिटल माहिती प्रणाली यासारख्या वैशिष्ट्यांमुळे प्रवाशांचा अनुभव आणखी वाढेल.