मुंबई : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीवर राज्यातून रेल्वे मार्गाने जाणाऱ्या लाखो अनुयायांसाठी मध्य रेल्वे प्रशासन विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मुंबई-पुणे-नागपूर आणि नागपूर-भुसावळ-नाशिक रोड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.