मुंबई : मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर, पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम दरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.
मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 वाजून 55 मिनिटांपासून ते 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 पासून ते 4.05 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 12.15 वाजल्यापासून ते पहाटे 4.15 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
रेल्वे मेगाब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी मुंबई - वाशी सेक्शनवर विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल. रेल्वे मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.