मुंबई : बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोंडीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याच्या राजकीय चर्चांणा उधाण आले होते. मात्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुंडे यांनी मी राजीनामा देणार नाही असे मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी धनंजय मुंडे यांच्या देहबोलीत आत्मविश्वास दिसून आला. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड अडकले असले तरी मुंडे यांच्यावर कोणताही थेट ठपका नाही. त्यामुळे सीआयडी आणि एसआयटी चौकशीतून काही निष्पन्न होईपर्यंत मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा आत्मविश्वास टिकून असल्याची चर्चा केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीसाठी मंगळवारी धनंजय मुंडे आले होते. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावत राजनामा देणार नाही असे म्हटले. मात्र देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते मंत्री मुंडेविरोधात एकवटले आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती त्यांना दिली. या भेटीनंतर
हेही वाचा : Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधी मिळणार?