रायगड: सद्या विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढतांना दिसून येतंय. त्यातच आता रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. रायगडच्या पेण तालुक्यामध्ये आठवीत शिकणाऱ्या मुलाने आपल्याच वर्गमित्राची निर्घृण हत्या केलीय.अमली पदार्थांचं सेवन करण्याच्या वादावरून ही हत्या झाल्याचं बोललं जातंय. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या मित्राचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दिला.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
याबाबत सविस्तर:
या दोन्ही वर्गमित्रांना अंमली पदार्थांचं व्यसन लागलं होत. शाळेला सुट्टी मारून हे दोघे अंमली पदार्थाचं सेवन करत होते. आपल्या वाटेचे अंमली पदार्थांचे सेवन मित्राने केल्याने आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने आपल्याच वर्गमित्राची निर्घृणपणे हत्या केली. डोक्याला जबर मार लागल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. मित्राची हत्या केल्यानंतर आरोपीनं त्याचा मृतदेह एका झाडीत टाकून घटनास्थळावरून पळ काढला. पण परिसरातील काही जणांना या विद्यार्थ्याचा मृतदेह दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी पोलिसांनी छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले असून संबंधित आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. दरम्यान सद्या विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्याने पोलिसांसमोर मोठे आवाहन येऊन ठेपले आहे. त्याचबरोबर पालकांची चिंता देखील वाढत असल्याचं पाहायला मिळतय.