Tuesday, December 10, 2024 12:32:50 AM

Chhatrapati Sambhajinagar
रामगिरी महाराजांच्या विधानावर मुसलमानांचा आक्षेप

रामगिरी महाराजांच्या विधानावर आक्षेप घेत मुसलमानांनी छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस ठाण्याबाहेर राडा केला.

रामगिरी महाराजांच्या विधानावर मुसलमानांचा आक्षेप

छत्रपती संभाजीनगर : रामगिरी महाराजांच्या विधानावर आक्षेप घेत मुसलमानांनी छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस ठाण्याबाहेर राडा केला. मुसलमानांच्या दबावामुळे रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल झाला.

रामगिरी महाराजांच्या कोणत्या वक्तव्यावरुन वाद ?

मोहम्मद पैगंबराने अल्पवयीन मुलीशी लग्न केले, अशा स्वरुपाचे वक्तव्य रामगिरी महाजारांनी केले. या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला. मुसलमानांनी रामगिरी महाराज यांच्या विरोधात पवित्रा घेतला.

पोलीस ठाण्यात गुन्हा

रामगिरी महाराजांच्या विधानावर मुसलमानांनी आक्षेप घेत संभाजीनगरात गोंधळ घातला. संभाजीनगरात पोलीस ठाण्याबाहेर मुसलमानांचा जमाव एकत्र आला. यावेळी रामगिरी महाराजांविरोधात वैजापूर आणि येवले या ठिकाणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. 

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

विशेष म्हणजे रामगिरी महाराजांच्या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. त्यांनी रामगिरी महाराजांच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

रामगिरी महाराजांच्या विधानावर मुसलमानांचा आक्षेप 
संभाजीनगरात पोलीस ठाण्याबाहेर मुसलमानांचा जमाव
रामगिरी महाराजांविरोधात वैजापुरात गुन्हा दाखल 

'संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही'
रामगिरींच्या कार्यगौरवानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांचे वक्तव्य

सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

रामगिरी महाराजांच्या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते. यावर शिउबाठाच्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांना सरकार पुरस्कृत दंगली घडवायच्या आहेत का ? असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo