मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी २८८ पैकी २८३ जागांवर महायुतीने उमेदवार जाहीर केले. तर मविआने २७५ जागांवर उमेदवार जाहीर केले. उर्वरित जागांबाबत दोन्ही आघाड्यांची भूमिका पुढील काही तासांत जाहीर होईल. महायुती पाच तर मविआ १३ जागांबाबत काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिल्याचे सूत्रांकडून समजते. पण पक्षाकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिला मुसलमान उमेदवार
काँग्रेसची पाचवी यादी जाहीर
काँग्रेसची डोकेदुखी
काँग्रेसने पाचव्या यादीतून ४, चौथ्या यादीतून १४, तिसऱ्या यादीतून १६, दुसऱ्या यादीतून २३ आणि पहिल्या यादीतून ४८ असे एकूण १०५ उमेदवार जाहीर केले. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसकडून राजेश भरत लाटकर आणि मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती या दोघांनीही निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली आहे. यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसने पाचवी यादी जाहीर करताना काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार त्यांनी लाटकर यांची उमेदवारी मागे घेऊन मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार १०४ झाले आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ८८ उमेदवार
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाचव्या यादीतून ५, चौथ्या यादीतून ७, तिसऱ्या यादीतून ९, दुसऱ्या यादीतून २२ आणि पहिल्या यादीतून ४५ असे एकूण ८८ उमेदवार जाहीर केले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ८३ उमेदवार
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तिसऱ्या यादीतून ३, दुसऱ्या यादीतून १५ आणि पहिल्या यादीतून ६५ असे एकूण ८३ उमेदवार जाहीर केले आहेत.