Thursday, September 12, 2024 12:15:04 PM

BJP
'भाजपा नेत्यांच्या अटकेसाठी मविआचे षडयंत्र'

भाजपा नेत्यांच्या अटकेसाठी मविआने षडयंत्र रचले होते; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपा नेत्यांच्या अटकेसाठी मविआचे षडयंत्र

नागपूर : भाजपा नेत्यांच्या अटकेसाठी मविआने षडयंत्र रचले होते; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मविआ काळात माझ्यासह अनेक नेत्यांना खोटे गुन्हे नोंदवून अटक करण्यासाठी षडयंत्र झाली. मात्र अनेक चांगले अधिकारी होते ज्यांनी त्या त्या वेळी त्या त्या स्तरावर खोटे गुन्हे नोंदवण्यास नकार दिला; असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मविआची सत्ता होती त्या काळात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न मविआकडून सुरू होता. त्यावेळी 'पोलीस ठाण्यात हजर होतो, जे प्रश्न विचारायचे आहेत ते विचारा' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सर्व प्रसारमाध्यमांचे फडणवीसांकडेच लक्ष होते. फडणवीस पूर्ण तयारीनिशी परिस्थितीला सामोरे गेले. ते डगमगले नाही आणि या अनपेक्षित प्रतिसादामुळे सत्ताधारी मविआची कोंडी झाली. बनावट प्रकरणात अडकवून अटक करण्याचा डाव फसला. देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. याआधी भाजपा आमदार नितेश राणे यांनीही फडणवीस यांना अटक मविआचा डाव होता असा आरोप केला होता. 


सम्बन्धित सामग्री