Tuesday, December 10, 2024 10:02:13 AM

MVA Manifesto
मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि मविआच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला.

मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि मविआच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. मविआच्या जाहीरनाम्याला महाराष्ट्रनामा असे नाव देण्यात आले आहे. 

मविआच्या जाहीरनाम्याला 'महाराष्ट्रनामा' असं नाव
खरगेंकडून मविआचा 'महाराष्ट्रनामा' प्रसिद्ध

'मोदींनी शिवरायांचा अपमान केला'
'मोदी जिथे हात लावतात ती वस्तू बिघडते'
मालवणमधील पुतळा दुर्घटनेवर खरगेंचा मोदींवर निशाणा

मविआच्या जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा

  1. महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये देणार 
  2. महिलांचा बस प्रवास मोफत करणार 
  3. सहा घरगुती गॅस सिलेंडर ५०० रुपयांत 
  4. महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार 
  5. जन्मास आलेल्या मुलीस १८ वर्षांनंतर १ लाख रुपये देणार 
  6. शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यास ५० हजारांची सूट 
  7. शेतकरी आत्महत्या रोखण्यास उच्चस्तरीय समिती 
  8. शेतमालाला हमीभाव देणार, पिकविम्याच्या जाचक अटी काढणार 
  9. सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ४ हजार मानधन 
  10. एपीएमसी परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत लावणार 
  11. बार्टी, महाज्योती, सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार 

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo