मुंबई : महाविकास आघाडी अर्थात मविआचा जाहीरनामा रविवारी १० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि मविआतील मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. जाहीरनाम्याचे प्रकाशन रविवारी मुंबईत पंचतारांकीत हॉटेलमध्ये होणार आहे.