Friday, June 13, 2025 07:34:27 PM

उद्धवना मविआने वाऱ्यावर सोडले

महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना वाऱ्यावर सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

उद्धवना मविआने वाऱ्यावर सोडले

मुंबई : महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना वाऱ्यावर सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्धव यांनी भाजपासोबतची निवडणूकपूर्व युती तोडून मविआत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपद मिळवले. पण २०२४ मध्ये उलट परिस्थिती दिसत आहे. मविआतील घटक पक्ष उद्धव यांना मुख्यमंत्रिपदाचा नेता म्हणून पुढे आणण्यास इच्छुक नाही. याच कारणामुळे मविआने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा नेता जाहीर केलेला नाही. उद्धव यांनी दिल्लीत तसेच राज्यात मविआच्या नेत्यांना वारंवार संपर्क केला. पण मविआतील घटक पक्ष उद्धव यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. शरद पवारांनी उद्धव यांची निवडणुकीआधी मुख्यमंत्री जाहीर करण्याची मागणी फेटाळली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.


सम्बन्धित सामग्री