Thursday, November 13, 2025 07:37:00 AM

Sameer Wankhede : 'माझ्या पत्नी, बहिणीला पाकिस्तान, UAE, बांगलादेशमधून द्वेषपूर्ण संदेश येत आहेत'; समीर वानखेडे यांचा खळबळजनक दावा

वानखेडे यांनी दावा केला आहे की त्यांच्या पत्नी आणि बहिणीला पाकिस्तान, युएई आणि बांगलादेशमधून धमक्या आणि द्वेषपूर्ण संदेश येत आहेत.

sameer wankhede  माझ्या पत्नी बहिणीला पाकिस्तान uae बांगलादेशमधून द्वेषपूर्ण संदेश येत आहेत समीर वानखेडे यांचा खळबळजनक दावा
Sameer Wankhede

Sameer Wankhede On Ba*ds Of Bollywood Row: माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स विरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा खुलासा केला आहे. वानखेडे यांनी दावा केला आहे की त्यांच्या पत्नी आणि बहिणीला पाकिस्तान, युएई आणि बांगलादेशमधून धमक्या आणि द्वेषपूर्ण संदेश येत आहेत. समीर वानखेडे यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, 'माझ्या कुटुंबाचा माझ्या व्यवसायाशी किंवा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तरीदेखील, त्यांना सोशल मीडियावरून धमक्या आणि अपशब्दांचा सामना करावा लागत आहे. मी माझ्यामुळे त्यांना त्रास होऊ देणार नाही. माझ्या पत्नी आणि बहिणीला येणाऱ्या धमक्यांबाबत आम्ही पोलिसांना वारंवार माहिती दिली आहे. अशा प्रकारे कुटुंबाला लक्ष्य करणे अयोग्य आहे.' 

वानखेडे यांनी म्हटलं आहे की, हा खटला प्रसिद्धीचा नाही, तर माझ्या स्वाभिमान आणि वैयक्तिक प्रतिष्ठेचा आहे. तुम्ही विडंबन किंवा व्यंगचित्र बनवू शकता, पण कोणाच्याही सन्मानाशी खेळ करू नका. त्यांनी स्पष्ट केलं की ते भारत सरकारचे निष्ठावंत अधिकारी आहेत आणि सर्व काही नियम आणि कायद्यांनुसार केले गेले आहे. मला मिळणाऱ्या द्वेषपूर्ण संदेशांवर कोणताही स्वाभिमानी व्यक्ती गप्प बसणार नाही. मी कायदेशीर मार्गाने लढा देईन, असं समीर वानखेडे यांनी नमूद केलं आहे.

हेही वाचा -  Amitabh Bachchan 83rd Birthday : मध्यरात्रीपासूनच जल्लोष! अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा'समोर चाहत्यांची गर्दी; कन्या आणि नातही पोहोचली

ड्रग्जविरोधी लढ्याबाबत मोठं वक्तव्य

दरम्यान, समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे की, ड्रग्जचा गैरवापर हा देशासाठी मोठा धोका आहे. अशा गोष्टींवरून माझी आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन केली जात आहे, जी अत्यंत चुकीची आहे. 

हेही वाचा - Mana che Shlok: मृण्मयी देशपांडेचा 'मनाचे श्लोक' चित्रपटाचा शो बंद पाडला ; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

काय आहे नेमकं प्रकरण? 

हे संपूर्ण प्रकरण ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सिरीजशी संबंधित आहे. ही सिरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली असून याची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंटने केली आहे. वानखेडे यांनी असा आरोप केला आहे की, या मालिकेतील एका पात्राचे त्यांच्याशी अत्यंत साम्य आहे आणि ती मालिका त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देण्यासाठी जाणूनबुजून तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात वानखेडे यांनी 2 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात आर्यन खान, रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड (शाहरुख आणि गौरी खान यांच्या मालकीची कंपनी) आणि नेटफ्लिक्स यांचा समावेश आहे.  


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या