Monday, May 11, 2026 11:06:54 AM

Student Ends Life : नागपूर IIT मध्ये विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल; नवव्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, धक्कादायक कारण समोर

श्रेयस गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता. तो वर्गातही नियमितपणे येत नव्हता आणि मित्रांशी बोलणेही त्याने कमी केले होते, अशी माहिती मिळाली आहे.

student ends life  नागपूर iit मध्ये विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल नवव्या मजल्यावरून उडी घेत  संपवलं जीवन धक्कादायक कारण समोर

Nagpur IIT Student Ends Life : नागपूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये एका विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रेयस चंद्रकांत माने असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने सोमवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास वसतिगृहाच्या 9 व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. मूळचा कोल्हापूरचा असलेला श्रेयस या संस्थेत द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे, तो स्वतः 4 थ्या मजल्यावर राहत असताना 9 व्या मजल्यावर गेला आणि तिथून त्याने उडी घेतली, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अभ्यासाचा तणाव आणि पालकांची इच्छा?
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयसची सेमिस्टर परीक्षा सुरू होणार होती आणि त्याचा पुरेसा अभ्यास झाला नव्हता. याच कारणामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता. तो वर्गातही नियमितपणे येत नव्हता आणि मित्रांशी बोलणेही त्याने कमी केले होते. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, श्रेयसने केवळ पालकांच्या इच्छेखातर आयआयटीला प्रवेश घेतला होता. मात्र, या शिक्षणामुळे तो आनंदी नव्हता. मानसिक ताण-तणावाचा भार सहन न झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - Beed Crime: बीड हादरलं! जन्मदात्या पित्यानेच चिमुकल्या मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवण्याचा केला प्रयत्न, संतापजनक कारण समोर

विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि पोलीस तपास
या घटनेनंतर कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी रात्रभर आंदोलन करत निषेध नोंदवला. बुट्टीबोरी पोलिसांनी सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. श्रेयसचा मोबाईल सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तो अनलॉक झाल्यानंतरच आत्महत्येमागचे नेमके आणि अधिकृत कारण स्पष्ट होऊ शकेल. पोलिसांनी श्रेयसच्या पालकांना या घटनेची माहिती दिली असून त्यांनी तातडीने नागपूर गाठले आहे. मुलाच्या या निर्णयामुळे माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील चिंतेचा विषय
परीक्षेच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. उच्च शिक्षणातील वाढती स्पर्धा आणि पालकांच्या अपेक्षांचा ओझं विद्यार्थ्यांच्या जिवावर कसं बेतत आहे, याचा हा एक भीषण नमुना ठरला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. 9 व्या मजल्यावर श्रेयस कोणालाही न दिसता कसा पोहोचला, याचीही चौकशी केली जात आहे.

हेही वाचा - Kalyan: अरे बापरे! एसी लोकलच्या टपावर चढला तरुण, कल्याणमध्ये 50 मिनिटांचा ड्रामा; पोलिसांची दमछाक


सम्बन्धित सामग्री