मुंबई : देवेंद्र फडणवीस यंदाची विधानसभेची निवडणूक हरणार... महाराष्ट्रात मविआची सत्ता येणार... मविआ सत्तेत आली की केंद्रातून चंद्राबाबू आणि नितीशकुमार मोदींचा पाठिंबा काढून घेणार... ही भाकितं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. एका प्रचारसभेत बोलताना नाना पटोले यांनी ही भाकीतं केली. याआधी लोकसभा निवडणुकीच्यावेळी नाना पटोलेंसह काँग्रेसचे अनेक नेते भाजपाचा पराभव होणार आणि मोदींची सत्ता जाणार असे सांगत होते. प्रत्यक्षात नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.