Narak Chaturdashi 2025 : दिवाळीच्या एक दिवस आधी अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो. यावर्षी हा सण 19 ऑक्टोबर रोजी येत आहे. या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. याला छोटी दिवाळी किंवा रूप चतुर्दशी असेही म्हणतात. चला, जाणून घेऊया या स्नानाची पद्धत आणि त्याचे महत्त्व..
नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुर राक्षसाचा वध करून हजारो महिलांची त्याच्या कैदेतून सुटका केली होती. यामुळेच हा दिवस अंधारावर आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक बनला आहे. याच कारणामुळे हा सण दिवाळीच्या आधी दिवाळीप्रमाणे साजरा केला जातो आणि याला छोटी दिवाळी असेही म्हणतात. हा सण दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील दुसऱ्या दिवशी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला येतो. यावर्षी नरक चतुर्दशी रविवारी, 19 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.
या दिवशी अभ्यंग स्नान आणि यम दीपदानासोबतच श्रीकृष्ण, यमराज आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नरक चतुर्दशीचे स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. त्याचबरोबर नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी यमराजासाठी दिवा लावला जातो, ज्यामुळे अकाल मृत्यूचे भय दूर होते. या दिवशी 14 दिवे लावण्याची परंपरा आहे, ज्यामध्ये एक दिवा मोहरीच्या तेलाचा यमासाठी असतो, तर उर्वरित 13 दिवे तुपाचे असतात.
अभ्यंग स्नानाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व
नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाचे मोठे महत्त्व आहे. हे स्नान शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवते, असे मानले जाते. कारण, ते थंडीच्या हंगामाच्या सुरुवातीला केले जाते. या स्नानाचे महत्त्व केवळ धार्मिक नसून वैज्ञानिकही आहे. या स्नानामध्ये प्रथम संपूर्ण शरीरावर तिळाचे किंवा मोहरीचे तेल लावले जाते. यामुळे त्वचेतील विषारी घटक बाहेर पडतात आणि शरीरात ऊर्जेचा संचार होतो. थंडीच्या सुरुवातीला हे स्नान शरीराला उबदार ठेवते. तसेच गंगाजलाचा वापर केल्याने शरीर आणि मन दोघांची शुद्धी होते, ज्यामुळे दिवसभर केलेले कार्य शुभ फलदायी होते.
हेही वाचा - Narak Chaturdashi 2025 Date: नरक चतुर्दशी कधी आहे?, जाणून घ्या अभ्यंग स्नानाचा मुहूर्त
नरक चतुर्दशी (अभ्यंग) स्नानाचा शुभ मुहूर्त
- यंदा 20 ऑक्टोबर, सोमवार रोजी नरक चतुर्दशीचे अभ्यंग स्नान करण्याचा मुहूर्त 1 तास 12 मिनिटांचा आहे.
- या दिवशी चंद्रोदय सकाळी 5 वाजून 13 मिनिटांनी होणार आहे. या दिवशी तुम्ही सकाळी 05 वाजून 13 मिनिटांपासून ते सकाळी 06 वाजून 25 मिनिटांपर्यंत नरक चतुर्दशीचे स्नान करू शकता.
- स्नानाच्या दिवशी ब्राह्म मुहूर्त सकाळी 04:44 पासून 05:34 पर्यंत आहे, तर शुभ वेळ म्हणजेच अभिजीत मुहूर्त सकाळी 11:43 पासून दुपारी 12:28 पर्यंत आहे.
अभ्यंग स्नानाची अचूक पद्धत
- सूर्योदयापूर्वी ब्राह्म मुहूर्तावर उठावे. घराची साफ-सफाई करावी.
- शरीरावर तिळाचे किंवा मोहरीच्या तेल लावून अंगमर्दन (Massage) करावे किंवा चोळून तेल लावावे. या तेलाच्या लेपामुळे शरीराची शुद्धी होते आणि ते आयुष्य वाढवते तसेच रोगांपासून संरक्षण करते.
- शरीरावर चंदन, हळद, बेसन किंवा गुलाबजलापासून बनवलेला उटणं (उबटन) लावावं.
- त्यानंतर गंगाजल किंवा गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे.
- स्नान झाल्यावर सूर्य देवाला अर्घ्य द्यावे आणि त्यांच्यासमोर दिवसभरासाठी ऊर्जा आणि शांतीची प्रार्थना करावी.
- स्नान पूर्ण झाल्यावर दीपावलीच्या सजावटीला सुरुवात करावी.
नरक चतुर्दशीला सर्वार्थ सिद्धी योग
नरक चतुर्दशीला दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग कायम आहे. सर्वार्थ सिद्धी योगामध्ये केलेली कामे यशस्वी होतात, हा एक शुभ योग मानला जातो. नरक चतुर्दशीला अमृत सिद्धी योग सायंकाळी 05 वाजून 49 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 20 ऑक्टोबरला सकाळी 06 वाजून 25 मिनिटांपर्यंत राहील. तसेच त्या दिवशी इंद्र योग सकाळपासून रात्री 02:05 पर्यंत आहे. उत्तराफाल्गुनी नक्षत्र सकाळपासून सायंकाळी 05 वाजून 49 मिनिटांपर्यंत आहे, त्यानंतर हस्त नक्षत्र सुरू होईल.
हेही वाचा - Diwali 2025: भारतातील 'या' ठिकाणी दिवाळी का साजरी केली जात नाही?, जाणून घेऊया त्यामागील श्रद्धा काय?