Tuesday, December 10, 2024 10:36:34 AM

Narendra Modi
'काँग्रेसला ओबीसींची चीड येते'

काँग्रेसला ओबीसींची चीड येते; या शब्दात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

काँग्रेसला ओबीसींची चीड येते

अकोला : काँग्रेसला ओबीसींची चीड येते; या शब्दात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसला दलित, आदिवासी यांची प्रगती बघवत नाही. त्यांचा आरक्षणाला विरोध आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी त्यांनी कर्नाटकमधून वसुली केली आहे; असे आरोप पंतप्रधान मोदी यांनी केले. ते अकोला जिल्ह्यातील प्रचारसभेत बोलत होते. 

विदर्भाचा आशीर्वाद नेहमी विशेष असतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रचारसभेत बोलताना त्यांनी राम मंदिराचा उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालयाने नऊ नोव्हेंबर रोजी राम मंदिराबाबतचा ऐतिहासिक निर्णय दिला. यामुळे नऊ नोव्हेंबर हा दिवस महत्त्वाचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पायाभूत विकासाच्या विषयावर बोलताना पंतप्रधान मोदींनी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचा उल्लेख केला. महाराष्ट्रात तयार होत असलेल्या वाढवण बंदराची ताकद अफाट आहे. कार्यरत झाल्यावर हे देशातील सर्वात मोठे बंदर असेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. महायुतीचा भर राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि त्यांच्या क्षमतेचा विस्तार करणे यावर आहे; असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. यामुळे मराठी भाषेत संशोधनाला चालना मिळेल. देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषेसाठी वर्ग सुरू करता येतील. राज्याच्या प्रगतीसाठी महायुती शक्य ते ते करेल असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले.

मविआ म्हणजे भ्रष्टाचार आणि घोटाळे. जिथे काँग्रेसची सत्ता आहे ते प्रत्येक राज्य काँग्रेस एटीएमसारखे वापरते आणि स्वतःचा फायदा करुन घेते. राज्याची प्रगती होण्याऐवजी नुकसान होते; अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सिंचनाचे प्रकल्प सुरू केले. या प्रकल्पांना मविआने ब्रेक लावला. महायुतीची सत्ता आल्यावर पुन्हा एकदा हे प्रकल्प मार्गी लागले आहेत; असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

देश जितका कमकुवत तेवढी काँग्रेस मजबूत असा प्रकार होत आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काँग्रेस सतत प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या या षडयंत्रापासून सावध व्हा असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

अकोल्यात पंतप्रधान मोदींची सभा 
शिवरायांची प्रतिमा देत पंतप्रधान मोदींचं स्वागत
मोदींच्या भाषणाची मराठीतून सुरुवात
विदर्भाचा आशीर्वाद माझ्यासाठी नेहमी विशेष - मोदी
'नऊ नोव्हेंबर ही ऐतिहासिक तारीख'
नऊ नोव्हेंबरला राम मंदिरावर न्यायालयाने निर्णय दिला  - मोदी
महाराष्ट्रातील वाढवण बंदराची ताकद अफाट - मोदी
वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठं बंदर - मोदी
राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर केंद्राचा भर - मोदी
महाराष्ट्राच्या जनतेला राजकारणाची चांगली समज- मोदी
आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला - मोदी
'मविआ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळे'
पंतप्रधान मोदींचा मविआवर हल्लाबोल
'जेथे काँग्रेसची सत्ता ते राज्य काँग्रेसचं एटीएम'
'फडणवीसांनी सुरु केलेल्या सिंचन प्रकल्पावर मविआचा ब्रेक'
देश जितका कमजोर, काँग्रेस तितकी मजबूत - मोदी
काँग्रेसकडून बाबासाहेबांचा वारंवार अपमान - मोदी
जाती - जातीत वाद लावून काँग्रेस फायदा घेईल - मोदी
'काँग्रेसच्या षड्यंत्रापासून सावध राहा'


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo