Tuesday, December 10, 2024 11:55:48 AM

Narhari Zirwal
पवारांचा आशीर्वाद, झिरवाळांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नरहरी झिरवाळ यांनी शरद पवारांचा दुरून आशीर्वाद असल्याचा दावा केला.

पवारांचा आशीर्वाद झिरवाळांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नरहरी झिरवाळ यांनी शरद पवारांचा दुरून आशीर्वाद असल्याचा दावा केला. या दाव्यामुळे निवडणूक निकालानंतर झिरवाळ काय करणार याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. 

अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरीतून नरहरी झिरवाळ यांनी उमेदवारी दिली आहे. झिरवाळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात होते त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. 


- राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी शरद पवार यांचे मला दुरून आशीर्वाद राहणार
- दिंडोरीतून नरहरी झिरवाळ काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह करणार उमेदवारी अर्ज दाखल
- सलग तिसऱ्यांदा नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेस कडून दिंडोरी विधानसभेच्या मैदानात
- धनराज महाले यांना मी विनंती करणार ते उमेदवारी अर्ज मागे घेतील मला विश्वास
- धनराज महाले यांनी बंडखोरी करत निवडणूक लढण्याचा घेतला आहे निर्णय
- धनराज महाले शिवसेनेकडून दिंडोरी विधानसभा मतदारसंघात इच्छुक होते मात्र ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याने महाले यांनी निवडणूक लढण्याचा घेतला हे निर्णय 
- विकासाच्या मुद्द्यावर मला दिंडोरीतील मतदार निवडून देतील
- 100% मी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार झिरवाळ यांना विश्वास


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo