Wednesday, December 11, 2024 12:18:44 PM

Palghar
नरिमन पॉईंट ते विरार ३५ मिनिटात

मुंबईचा सागरी किनारा मार्ग विरारपर्यंत आणणार आहे. या मार्गामुळे नरिमन पॉईंट ते विरार हा प्रवास अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत पूर्ण करता येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी पालघरकरांना दिले.

नरिमन पॉईंट ते विरार ३५ मिनिटात

पालघर : मुंबईचा सागरी किनारा मार्ग विरारपर्यंत आणणार आहे. सागरी किनारा मार्ग लवकरच पूर्ण करणार आहे. या मार्गामुळे नरिमन पॉईंट ते विरार हा प्रवास अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत पूर्ण करता येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना दिले. ते पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलत होते. 

पालघर जिल्ह्यात देशातील सर्वात मोठे असे वाढवण बंदर सुरू होत आहे. या बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींनी केले आहे. लवकरच हे बंदर कार्यरत होईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. वाढवण बंदर आणि किनारा मार्ग या व्यतिरिक्त पालघर जिल्ह्यात एक विमानतळ उभारणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी विमानतळाबाबतची घोषणा केली, आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी निश्चिंत राहावे, लवकरच विमानतळ उभारले जाईल; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. बंदर, रस्ता, विमानतळ या योजनांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पालघर जिल्ह्याचा विकास करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. कोळी बांधव समृद्ध झालेले दिसतील. महायुती सरकार भूमिपुत्रांच्या हातांना काम देणार; असेही आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत बोलताना दिले.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo