Thursday, February 12, 2026 07:26:05 PM

'मस्त' ऑफर! मतदान करा आणि जेवणावर मिळवा 10 टक्के सूट; लोकशाहीच्या उत्सवात हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

नाशिकमध्ये सध्या थंडीचा कडाका असला तरी, &quotथंडीमुळे घरात बसून राहू नका, लवकर बाहेर पडा आणि मतदान करा,&quot असे आवाहन हॉटेल व्यावसायिकांनी केले आहे.

मस्त ऑफर मतदान करा आणि जेवणावर मिळवा 10 टक्के सूट लोकशाहीच्या उत्सवात हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

Nashik Mahapalika Election 2026 : नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या (NMC Election 2026) निमित्ताने आज शहरात मतदानाची प्रक्रिया उत्साहात पार पडत आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी केवळ प्रशासनच नाही, तर आता स्थानिक व्यावसायिकही पुढे सरसावले आहेत. नाशिकमधील काही प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकांनी मतदारांसाठी एक विशेष ऑफर जाहीर केली आहे. ज्या नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे, त्यांना हॉटेलच्या बिलावर थेट 10 टक्के सवलत दिली जात आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी आणि लोकांना घराबाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे.

थंडी बाजूला सारा आणि गरम पदार्थांचा आस्वाद घ्या!
नाशिकमध्ये सध्या थंडीचा कडाका असला तरी, "थंडीमुळे घरात बसून राहू नका, लवकर बाहेर पडा आणि मतदान करा," असे आवाहन हॉटेल व्यावसायिकांनी केले आहे. 'हॉटेल फोडणी' सारख्या आस्थापनांनी मतदारांसाठी गरम गरम महाराष्ट्रीयन पदार्थांची मेजवानी ठेवली आहे. मतदान करून आल्याचे बोटावरील शाई दाखवणाऱ्या ग्राहकांना बिलामध्ये सवलत देऊन त्यांचा गौरव केला जात आहे. सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत शहरात सुमारे 10 ते 11% मतदान झाले असून, दुपारपर्यंत हा आकडा वाढेल असा विश्वास मनपा आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Nitin Gadkari : एका 'कुत्र्या'ने कसा मिळवून दिला पहिला महापालिका विजय? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उलगडला रंजक किस्सा

विकासासाठी हवा 'योग्य' उमेदवार
या उपक्रमाचा लाभ घेणाऱ्या नाशिककरांनीही समाधान व्यक्त केले आहे. सहकुटुंब मतदान करून हॉटेलमध्ये आलेल्या डॉ. राहुल सोनवणे यांनी सांगितले की, "चांगला उमेदवार निवडणे हे आपले कर्तव्य आहे आणि हॉटेलने दिलेली ही सूट एक प्रकारे मतदारांचा सन्मानच आहे." नागरिकांच्या मते, रस्ते, साफसफाई आणि पर्यटन विकास यांसारख्या स्थानिक समस्या सोडवू शकणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आहे. विशेषतः कुंभमेळा आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने नाशिकसाठी हा निवडणूक काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

आज, गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या या मतदानाच्या निमित्ताने संपूर्ण शहरात चैतन्याचे वातावरण आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या या कल्पकतेमुळे तरुण मतदारांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. "चांगला उमेदवार निवडल्यास आपले जीवन सुकर होईल," असे मत हॉटेल मालकांनी व्यक्त केले आहे. लोकशाहीचा हा उत्सव केवळ मतदानापुरता मर्यादित न राहता, तो अशा प्रकारे सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावरही साजरा होत असल्याने नाशिक मॉडेलचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - Voter ID Photo Mismatch : नाव रवींद्र अन् फोटो महिलेचा... पुण्यात मतदाराची झाली मोठी पंचाईत, पाहा व्हिडीओ


सम्बन्धित सामग्री