मुंबई : 15 जानेवारी हा दिवस भारताचा सागरी वारसा, नौदलाचा समृद्ध गौरवशाली इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी अतिशय महत्वपूर्ण दिवस ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत नौदल डॉकयार्ड येथे नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौका, आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आले.
या अत्याधुनिक युद्धनौकांमुळे भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे. येत्या काळात भारताच्या संरक्षण क्षेत्रात अधिक महत्वाचे बदल घडवण्यासाठी आपण तत्पर असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राष्ट्रापर्ण झालेल्या दोन अत्याधुनिक युद्धनौका आणि एका पाणबुडीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
भारताची सागरी क्षमता वाढली
आयएनएस सूरतची वैशिष्ट्ये
क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथे जहाज
जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावी विध्वंसकांपैकी एक
युद्धनौकेची लांबी 164 मीटर, अत्याधुनिक रडारने सुसज्ज
त्यात 75 टक्के स्वदेशी घटक आहेत. शत्रुला चकवा देण्याची क्षमता
जमिनीवरुन जमिनीवर आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी
प्रगत नेटवर्क आणि प्रगत शस्त्र सेन्सर पॅकेजने सुसज्ज
----
आयएनएस नीलगिरी (स्टील्थ फ्रिगेट)
हे P17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज आहे
भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोने त्याची रचना केलीय
या युद्धनौकेत प्रगत समुद्र-संरक्षणाचा समावेश
हे स्वदेशी फ्रिगेट्सच्या पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करणारं जहाज
जहाजात अत्याधुनिक तंत्रज्ञान असून समुद्रात दीर्घकाळ राहण्याची क्षमता
चेतक अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर, MH-60R हेलिकॉप्टर यावरून उडणार
जहाजात प्रगत सेन्सर्स आणि शस्त्र प्रणाली आहेत
आयएनएस वागशीर (पाणबुडी)
पी ७५ स्कॉर्पिन प्रोजेक्टमधील सहावी आणि शेवटची पाणबुडी
पाणबुडी बनवण्यासाठी फ्रान्सच्या नेव्हीची मदत घेण्यात आलीय
जगातील सर्वात शांत आणि बहुमुखी डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांपैकी एक
ही पाणबुडी अँटी-सर्फेस वॉरफेअर, अँटी-सबमरीन वॉरफेअर,
वायर-गाइडेड टॉर्पेडो, अँटी-शिप मिसाईल आणि प्रगत सोनार सिस्टीमने सुसज्ज आहे
एकविसाव्या शतकात भारताच्या लष्करी क्षमतांमधील वाढ व आधुनिकीकरणाच्या दृष्टीने या युद्धनौका महत्वाचे पाऊल आहे. जमीन, आकाश, खोल समुद्र अथवा अनंत अवकाश असो, भारताने सगळीकडे स्वतःचे हितरक्षण करण्यासाठी मोठी झेप घेतली आहे.