दिवाळसणाची तयारी सध्या जोमात सुरू आहे. अवघ्या काही दिवसांवरच आता धनत्रयोदशी येऊन ठेपली आहे. या दिवशी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. मात्र आता सोन्याच्या वाढत चाललेल्या किंमतींमुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत वायदा बाजारातील सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून आली आहे. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सोन्याचा भाव 1,31,840 रुपयांवर होता, जो मागील दिवसाच्या किमतीपेक्षा अंदाजे 1900 रुपयांनी वाढला असल्याचे समोर आहे. सध्या सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे या किंमती वाढल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
हेही वाचा - RBI Repo Rate Cut Possibility: वैयक्तिक कर्जाचा EMI कमी होणार? RBI कडून डिसेंबरमध्ये रेपो दर कपातीची शक्यता
सध्या मुंबईमध्ये सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी 1,32,770 रुपये, 22 कॅरेटसाठी 1,21,700 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 99,580 रुपये आहे. त्यामुळे दिवाळीत सोन्याच्या खरेदीला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळणार? हे आता पाहण्यासारखे आहे.
हेही वाचा - Gold Silver Price Today: धनत्रयोदशीपूर्वी सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या! जाणून घ्या आजचे ताजे दर
भारतीय संस्कृतीत धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. भारतात सोन्याचे सांस्कृतिक महत्त्व आहे आणि ते शतकानुशतके भारतीयांशी जोडले गेले आहे. म्हणूनच भारतातील लोक सोने खरेदी करणे शुभ मानतात.