Friday, February 07, 2025 11:37:01 PM

NCP leading in 39 seats
राष्ट्रवादी 39 जागांवर आघाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या 55 जागांपैकी 36 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी 39 जागांवर आघाडीवर

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरूवात झाली आहे. महायुतीमध्ये भाजपा 153, राष्ट्रवादी काँग्रेस 80, शिवसेना 55 जागांवर लढले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 55 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या 55 जागांपैकी 36 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

अहेरी मतदारसंघातून धर्मरावबाबा आत्राम आघाडीवर असल्याचे चित्र आहे. अहमदपूर मतदारसंघातून बाबासाहेब पाटील आघाडीवर आहेत. अहमदनगर शहरातून संग्राम जगताप आघाडीवर आहेत. तर अकोले विधानसभा मतदारसंघातून डॉ. किरण लहमाटे आघाडीवर आहेत. अमळनेर विधानसभा मतदारसंघात अनिल पाटील आघाडीवर आहेत. अंबेगाव मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील आघाडीवर आहेत. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून राजकुमार बडोले आघाडीवर आहेत. अरमोरी मतदारसंघातून रामदास मसराम आघाडीच्या छायेत आहेत.

विधानसभा निवडणुकीत बहुचर्चित असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. बसमत मतदारसंघातून चंद्रकांत नवघरे आघाडीवर आहेत. बीडमधून योगेश क्षीरसागर आघाडीवर आहेत. भोर विधानसभा मतदारसंघातून शंकर हिरामण मांडेकर आघाडीवर आहेत. देवोलाळी विधानसभा मतदारसंघातून सरोज अहिरे आघाडीवर आहेत. दिंडोरीमधून नरहरी झिरवळ आघाडीवर आहेत. गेवराईतून विजयसिंह शिवाजीराव पंडित आघाडीवर आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघातून चेतन तुपे आघाडीवर आहेत. इचलकरंजीतून राहुल अवाडे आघाडीवर आहेत. इगतपुरीमधून हिरामण खोसकर आघाडीवर आहेत. इंदापूर मतदारसंघात दत्तात्रय भरणे आघाडीवर आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ आघाडीवर आहेत.  

कोपगाव विधानसभा मतदारसंघातून अशुतोष काळे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. लोहातून प्रतापराव पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत. मावळमधून सुनिल शेळके आघाडीवर आहेत. निफाड मतदारसंघात दिलीपराव बनकर आघाडीवर आहेत. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. परनेरमधून काशीनाथ दाते आघाडीवर आहेत. पाथरी मतदारसंघात राजेश विटेकर आघाडीवर आहेत. साताऱ्यातील फलटण विधानसभा मतदारसंघात सचिन पाटील आघाडीवर आहेत. पिंपरीत अण्णा बनसोडे आघाडीवर आहेत. पुसद मतदारसंघात इंद्रनिल नाईक आघाडीवर आहेत. शाहापूर विधानसभा मतदारसंघात दौलत दरोडा आघाडीवर आहेत. शिरूरमध्ये ज्ञानेश्वर कटके आघाडीवर आहेत. सिंदखेड राजा मतदारसंघातून मनोज कायंदे आघाडीवर आहेत. सिन्नरमध्ये अँड माणिकराव कोकाटे आघाडीवर आहेत. तुमसरमधून राजू करेमोरे आघाडीवक आहेत. उदगीरमधून संजय बनसोडे आघाडीवर आहेत. वडगाव शेरी विजय टिंगरे आघाडीवर आहेत. साताऱ्याच्या वाईतून मकरंद जाधव आघाडीवर आहेत आणि नाशिक जिल्ह्यातील येवलामधून छगन भुजबळ आघाडीवर आहेत.        


सम्बन्धित सामग्री