Friday, February 13, 2026 01:09:50 AM

Amol Kolhe : 'दादा, तुमचं नाव हृदयात कायमचं कोरलेलं राहील'; खासदार डॉ. अमोल कोल्हे अजितदादांच्या आठवणीत भावूक

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया दिली.

amol kolhe  दादा तुमचं नाव हृदयात कायमचं कोरलेलं राहील खासदार डॉ अमोल कोल्हे अजितदादांच्या आठवणीत भावूक

बारामती : राष्ट्रवादीचे (शदरचंद्र पवार गट) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांचा अकाली मृत्यू साऱ्यांनाच चटका लावून गेला आहे. आज बारामतीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर खासदार कोल्हे यांची प्रतिक्रिया घेण्यात आली असून यावेळी हे अत्यंत भावून झाले. अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा खासदारकी मिळवली. त्यावेळी एकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. त्यामुळे अजित पवार यांचा मोठा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले. तसेच नुकतेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्येही पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील अनेक सभा आणि कार्यक्रमांमध्ये खासदार कोल्हे हे अजितदादांच्या सोबत दिसले. त्यामुळे अजितदादांचं असं अचानक जाणं त्यांच्यासाठीही मोठा धक्का असल्याचे ते म्हणाले.

खासदार कोल्हे यांनी सांगितले की, 'हा खूप मोठा धक्का आहे. फक्त अजितदादांच्या चाहत्यांसाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील हो मोठा धक्का आहे. आमच्या डोळ्यासमोर एक लोकनोता गेला. या लोकनेत्याची प्रशासनावर भक्कम पडक होती. देशातील राजकारणात खूप कमी असे राजकारणी आहेत, ज्यांची प्रशासनावर उत्तम पडक आहे, त्यापैकी एक अजितदादा होते. त्यामुळे त्यांचं जाण्याने आमच्या सर्वांच्याच आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. अजितदादांच्या पक्षातील नेतेमंडळी, कार्यकर्ते असो वा विरोधी पक्षातील आज सर्वांच्याच डोळ्यात पाणी आहे. हे दाखवून देतं की अजितदादांचं राज्यातील राजकारणातील स्थान किती मोठ आहे. हा जो जनसागर लोटला आहे, तो दादांच्या प्रेमापोटी आलेला आहे. या सगळ्यांना अजितदादांनी कधी ना कधी कोणत्या न कोणत्या स्वरुपात मदत केली आहे. त्यांनी मनाने जोडलेली ही गर्दी आहे.'

हेही वाचा : Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताशी साम्य असलेली आणखी एक दुर्घटना; खासदारासह 15 जणांचा करुण अंत


सम्बन्धित सामग्री