Tuesday, December 10, 2024 10:16:32 AM

NEELAM GORE VS ARVIND SAWANT
महिलांचा अपमान खपवून घेणार नाही

निवडणूक आयोगाने महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत तत्काळ कारवाई करावी - शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

महिलांचा अपमान खपवून घेणार नाही 
MANUNILE
MANUNILE

पुणे : शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य उद्धव सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘इंपोर्टेड माल चालणार नाही’ असे विधान केलेले आहे. अरविंद सावंत हे महाराष्ट्रातील महिलांना मूर्ख समजत आहेत. त्यांनी स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द बोलले आहेत. स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द खपवून घेणार नाहीत तसेच सावंत यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तात्काळ लेखी तक्रार दाखल करणार असल्याचे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. 

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमीन पटेल यांचा प्रचार करत असताना अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांच्यावर अपमानास्पद शब्द उच्चारत टीका केली होती. त्याबाबत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo