Saturday, January 25, 2025 08:14:09 AM

Neelam Gorhe congratulated the Chief Minister
नीलम गोर्‍हे यांनी केले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

नीलम गोर्‍हे यांनी केले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : काही दिवसांपूर्वी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शपथ घेतली. यानंतर आता आज दिनांक 9 डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तुळशीहार घालून सत्कार केला. तुळशीहार घालून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंद करत शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चाफ्याचा हार व महावस्त्र देऊन सत्कार केला. 

कोण आहेत नीलम गोऱ्हे?   

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडे पक्षातील एक जबाबदार आणि विश्वासू व्यक्तिमत्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिलं जातं. नीलम गोऱ्हे ह्या  विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या विधान परिषदेवर शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात. प्रवक्त्या म्हणून त्या माध्यमांसमोर शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडत असतात. राज्यातील महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्यानं आवाज उठवत असतात.

शिवसेनेची पुणे जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडं आहे. शिवसेनेतील एक अभ्यासू महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएसएएमची पदवी त्यांनाी घेतली. 1992 मध्ये त्यांनी बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमाही पूर्ण केला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांनी युवक क्रांती दल म्हणजेच युक्रांदच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. नीलम गोऱ्हे या चांगल्या संघटक असल्याने त्यांनी महाराष्ट्रात आपला चांगला ठसा उमटवला. 

नीलम गोऱ्हे यांची राजकीय पदे 

नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. त्यांनी 2005 मध्ये शिवसेना उपनेत्या म्हणून काम पाहिलं, 2007 मध्ये त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या झाल्या त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम केलं. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. 


 
 


सम्बन्धित सामग्री