मुंबई : बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग २०२४ च्या अंतिम फेरित नीरज चोप्रा सहभागी झाला होता. या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरित नीरजला विजेतेपद मिळवता आले नाही. भालाफेकमध्ये नीरजला सलग दुसऱ्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याचा सर्वोत्तम थ्रो ८७. ८६ मीटर होता. परंतु ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स त्याच्यापेक्षा फक्त ०.०१ मीटर पुढे होता. पीटर्सचा सर्वोत्तम थ्रो ८७. ८७ मीटर होता. यामुळे पीटर्स डायमंड लीगचा विजेता आणि नीरज चोप्रा डायमंड लीगचा उपविजेता झाला.