Sunday, November 16, 2025 11:36:49 PM

Asia Cup Trophy Missing: आशिया कप ट्रॉफी प्रकरणात नवा ट्विस्ट! ACC मुख्यालयातून आशिया कप ट्रॉफी गायब

मोहसिन नक्वी यांनी एसीसीच्या मुख्यालयातून आशिया कप ट्रॉफी काढून ती अबूधाबीतील एका अज्ञात ठिकाणी हलवली आहे.

asia cup trophy missing आशिया कप ट्रॉफी प्रकरणात नवा ट्विस्ट acc मुख्यालयातून आशिया कप ट्रॉफी गायब

Asia Cup Trophy Missing: दुबईत खेळल्या गेलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्याला जवळपास एक महिना उलटला आहे, पण विजेता ठरलेल्या टीम इंडियाला अद्याप अधिकृत ट्रॉफी मिळालेली नाही. या संपूर्ण प्रकरणामागे आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख मोहसिन नक्वी यांचे वादग्रस्त वर्तन कारणीभूत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

भारताचा विजय, पण ट्रॉफी अद्याप गायब

दरम्यान, 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. मात्र, विजयानंतरच्या सादरीकरण समारंभात नाट्यमय घडामोडी झाल्या आणि भारताला ट्रॉफी देण्यात आली नाही. भारतीय खेळाडूंनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.

आशिया कप ट्रॉफी गायब; एसीसी मुख्यालयात गोंधळ

वृत्तसंस्था ANI च्या माहितीनुसार, मोहसिन नक्वी यांनी एसीसीच्या मुख्यालयातून आशिया कप ट्रॉफी काढून ती अबूधाबीतील एका अज्ञात ठिकाणी हलवली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी एसीसी मुख्यालयाला भेट दिली असता, कर्मचाऱ्यांनी ट्रॉफी मुख्यालयात नसल्याचे सांगितले.

हेही वाचा ICC fines Afghanistan : अफगाणिस्तानला दुहेरी धक्का! झिम्बाब्वेकडून पराभवानंतर ICC कडून दंड

बीसीसीआयची कडक भूमिका

या घटनेमुळे बीसीसीआयने एसीसीविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा अधिकृतरित्या उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय मंडळाच्या मते, आशिया कपसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेच्या ट्रॉफीशी संबंधित असा प्रकार कधीच घडलेला नाही.

हेही वाचा - ICC Womens World Cup 2025: महिला विश्वचषकात भारताची चमक! न्यूझीलंडला मात देत सेमीफायनलमध्ये प्रवेश

ट्रॉफी घ्यायची असेल तर या मुख्यालयात; नक्वींची अट 

मोहसिन नक्वी यांनी भारतीय संघाला ट्रॉफी देण्यासाठी अट घातली होती. भारतीय प्रतिनिधींनी एसीसी मुख्यालयात येऊन ती माझ्याकडून घ्यावी, असं नक्वी यांनी म्हटलं होतं. यापूर्वी, अंतिम सामन्यानंतर झालेल्या एसीसी बैठकीत नक्वी यांनी माफी मागितल्याच्या बातम्या आल्या होत्या, परंतु त्यांनी नंतर त्या नाकारल्या. आता ट्रॉफीचे ठिकाण अज्ञात आहे, आणि या प्रकरणामुळे भारतीय व पाकिस्तानी क्रिकेटमधील तणाव पुन्हा वाढला आहे. बीसीसीआय पुढील पावले काय उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री