मुंबई : निलेश राणे २३ तारखेला शिवसेनामध्ये अधिकृत पक्ष प्रवेश करणार आहेत. कुडाळ मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात असून, निलेश राणे यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. यामुळे, त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयासंदर्भात कालपासून नारायण राणे यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू होत्या. निलेश राणे यांच्या पक्ष प्रवेशाने कुडाळ मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत.
निलेश राणे यांच्यासोबत 'शून्य प्रहर' पहा फक्त 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीवर