Thursday, September 12, 2024 10:58:08 AM

Nitesh Rane
'आंदोलन मराठ्यांसाठी, फायदा मुसलमानांना'

पोलीस भरती झाली त्यावेळी जरांगेंमुळे मुसलमानांनी आर्थिक आरक्षणाच्या तरतुदींचा फायदा घेतला. मराठ्यांना त्या तुलनेत काहीच मिळाले नाही; असे नितेश राणे म्हणाले.

आंदोलन मराठ्यांसाठी फायदा मुसलमानांना 

सिंधुदुर्ग : मनोज जरांगेंच्या मराठ्यांसाठीच्या आंदोलनाचा सर्वाधिक फायदा मुसलमानांना होत असल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना आहेत. पोलीस भरती झाली त्यावेळी जरांगेंमुळे मुसलमानांनी आर्थिक आरक्षणाच्या तरतुदींचा फायदा घेतला. मराठ्यांना त्या तुलनेत काहीच मिळाले नाही; असे नितेश राणे म्हणाले.

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळत होता. पण मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी आंदोलन केले. त्यांनी वातावरण तापवले. राज्य सरकारने मराठ्यांना राज्यघटनेच्या चौकटीत राहून आरक्षण देत असल्याचे सांगितले. पण जरांगे त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिले आणि मराठ्यांचे आंदोलन तीव्र करत गेले. याचा मराट्यांनाच फटका बसला आणि मुसलमानांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी फायदा झाला, असे नितेश राणे म्हणाले.


सम्बन्धित सामग्री