पुणे : फक्त हिंदूंशी आर्थिक व्यवहार करा, असे आवाहन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. पण विशिष्ट समाजाविरोधातली वक्तव्ये टाळा, असे आवाहन केले. यानंतर नितेश राणे यांचे सारवासारव करणारे वक्तव्य आले. राष्ट्रभक्त मुसलमानांच्यासोबत आहोत पण राष्ट्रविरोधी विचारांच्या मुसलमानांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही, अशी भूमिका नितेश राणे यांनी घेतली.