Saturday, November 15, 2025 01:54:29 PM

'पोलिसांना सुटी द्या, मग दाखवतो'

पोलिसांना एक दिवसाची सुटी द्या, मग दाखवतो; या शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी गणपती मिरवणुकांवर दगडफेक करणाऱ्यांना सुनावले.

पोलिसांना सुटी द्या मग दाखवतो

सांगली : पोलिसांना एक दिवसाची सुटी द्या, मग दाखवतो; या शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी गणपती मिरवणुकांवर दगडफेक करणाऱ्यांना सुनावले. सांगली येथील सभेत बोलताना नितेश राणे यांनी हा इशारा दिला. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांना लक्ष्य करुन दगडफेक करण्यात आली. या घटनांचा जाहीर निषेध करत पोलिसांना एक दिवसाची सुटी द्या, मग दाखवतो; असे नितेश राणे म्हणाले. मुसलमानांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांना लक्ष्य करुन दगडफेक केली. राड्यासाठी मशिदीतून शस्त्रे आणि दगड आणण्यात आले, असेही नितेश राणे म्हणाले. 

        

सम्बन्धित सामग्री