अकोला : उद्धव ठाकरे समर्थक नितीन बानगुडे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका केली. 'लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देत, मोठी जाहिरातबाजी आली... जर जाहिरातीवर खर्च केला नसता तर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळाले असते; अशी टीका बानगुडेंनी महायुती सरकावर केली आहे..
महायुती लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांत वाढ करणार
सत्तेत पुन्हा आल्यावर महायुती लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांत वाढ करणार आहे. सध्या लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये मिळतात. शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारने ही योजना राज्यात सुरू केली आहे. पुन्हा सत्तेत आल्यावर महायुतीचे सरकार लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देणार आहे. महायुतीतील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी हे आश्वासन दिले आहे. तर मविआचे नेते, प्रवक्ते आणि पदाधिकारी मागील काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका करत आहेत. आधी पैसेच मिळणार नाही, योजना बंद होईल अशा स्वरुपाची भाकीते केल्यानंतर आता मविआने लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीवर टीका करायला सुरुवात केली आहे.