Friday, December 05, 2025 01:29:38 PM

Bihar Election Result 2025: बिहारमधील प्रचंड विजयानंतर नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया; पंतप्रधान मोदी आणि चिराग पासवान यांचे मानले आभार

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत मतदारांचे आभार मानले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएतील सर्व मित्रपक्षांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.

bihar election result 2025 बिहारमधील प्रचंड विजयानंतर नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी आणि चिराग पासवान यांचे मानले आभार

Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाने राज्यातील सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. प्रचंड बहुमताचा स्पष्ट संदेश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत मतदारांचे आभार मानले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएतील सर्व मित्रपक्षांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत. नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, “बिहारच्या जनतेने आमच्या कामावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. 2025 च्या निवडणुकीत मिळालेल्या भक्कम जनादेशाबद्दल मी सर्व मतदारांना मन:पूर्वक सलाम करतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी विशेष आभार व्यक्त करतो.”

चिराग पासवानांसह मित्रपक्षांचेही कौतुक

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएची एकजूट हा या विजयाचा मुख्य आधार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “चिराग पासवान, जितनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांच्यासह सर्व मित्र पक्षांनी दाखवलेल्या ऐक्यामुळेच हा विजय शक्य झाला. या सहकार्यामुळे बिहार आणखी वेगाने प्रगती करेल आणि विकसित राज्यांच्या यादीत अग्रस्थानी पोहोचेल.”

हेही वाचा - Bihar Election Result 2025: बिहारमध्ये 'या' योजनेमुळे बदलला संपूर्ण गेम! नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान होणार?

एनडीएकडे बहुमत  

दरम्यान, 243 जागांच्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला प्रचंड आघाडी मिळाली असून, जवळपास 200 जागांवर विजय मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तथापी, भाजप तब्बल 90 टक्के स्ट्राईक रेटसह सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. एनडीएतील अनेक वरिष्ठ नेत्यांनीही मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.

हेही वाचा - PM Modi on Bihar Result : बिहारमधील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; जनतेचे आभार मानत दिले 'हे' आश्वासन

प्रमुख नेत्यांचे जोरदार पुनरागमन

कृषी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रेम कुमार यांनी गया शहराच्या जागेवर आपला विजयी प्रवास सुरू ठेवला. 1990 पासून ही जागा सांभाळणाऱ्या कुमार यांनी काँग्रेसचे उमेदवार अखौरी ओंकार नाथ यांचा 26,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. जनता दल (संयुक्त) नेते आणि माहिती आणि जनसंपर्क मंत्री महेश्वर हजारी यांनी चौथ्यांदा कल्याणपूर (एससी) जागा जिंकली. त्यांनी सीपीआय (एमएल) लिबरेशनचे उमेदवार रणजित कुमार राम यांचा 38,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. महसूल आणि जमीन सुधारणा मंत्री संजय सरावगी यांनी दरभंगा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजय मिळवला. मारवाडी समाजाचे असलेले सरावगी यांनी विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) चे उमेदवार उमेश साहनी (व्हीआयपी) यांचा 24,500 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.


सम्बन्धित सामग्री