Thursday, November 13, 2025 02:31:27 PM

मुख्यमंत्री शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज

विधानसभा निवडणुकीसाठी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला.

मुख्यमंत्री शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. याच मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या केदार दिघे यांनीही उमेदवारी अर्ज भरला. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटावर मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर केदार दिघे निवडणूक लढवत आहेत. दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीत जिंकू असा विश्वास व्यक्त केला. 

केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. तर मुख्यमंत्री शिंदे हे आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेले शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे हे २००४ पासून शिवसेनेचे विधानसभेतील  आमदार आहेत. तर केदार दिघे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. 


सम्बन्धित सामग्री