Saturday, January 25, 2025 08:33:00 AM

Jalna
जालन्यातील जनआक्रोश मोर्चातील आयोजकांना नोटीस

जालन्यातील जनआक्रोश मोर्चातील आयोजकांना एकीकडे मोर्चाला परवानगी तर दुसरीकडे पोलिसांच्या नोटीसा आल्या आहेत.

जालन्यातील जनआक्रोश मोर्चातील आयोजकांना नोटीस

जालना : जालन्यात आज आक्रोश मोर्चा काढण्यात येतआहे. देशमुख आणि सूर्यवंशींना न्याय मिळण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानापासून मोर्चाची सुरूवात होणार आहे. वैभवी देशमुख, धनंजय देशमुख, संभाजीराजे छत्रपती या मोर्चाला उपस्थित असणार आहेत. आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, राजेंद्र कोंढरे, विजयकुमार घाडगे देखील असणार आहेत. अशातच जालन्यातील जनआक्रोश मोर्चातील आयोजकांना एकीकडे मोर्चाला परवानगी तर दुसरीकडे पोलिसांच्या नोटीसा आल्या आहेत. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशुमख, अशोक पडूळ, विश्वभर तीरुखे यांना नोटीसा देण्यात आल्या. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ प्रमाणे या नोटीसा देण्यात आल्या आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

संतोश देशमुख यांच्या न्यायासाठी जालन्यातील जनआक्रोश मोर्चातील आयोजकांच्या नावे पोलिसांनी नोटीसा दिल्या आहेत. जालन्यातील संभाजी महाराज पुतळा ते अंबड चोफुली दरम्यान हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. एकीकडे कदीम पोलिसांनी  मोर्चाला परवानगी दिली तर दुसरीकडे पोलिसांनी  नोटीसा देखील पाठवल्या आहेत. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख , अशोक पडूळ, विश्वभर तीरुखे यांना नोटीसा देण्यात आल्यात. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 प्रमाणे नोटीसा दिल्या आहेत.

हेही वाचा : बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ जालन्यात आज जनआक्रोश मोर्चा


भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 काय?


भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 नुसार पोलिसांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. 2023 चे कलम 168, पोलिस अधिकाऱ्यांना दखलपात्र गुन्हे रोखण्यासाठी कारवाई करण्याचे अधिकार देते. जो गुन्हा दखल घेण्यासारखा आहे, ज्या गुन्ह्याला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते, त्या गुन्ह्याला दखलपात्र गुन्हा म्हणतात. दखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार असतो. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 नुसार कोणताही दखलपात्र गुन्हा घडू नये यासाठी या कलमामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. दखलपात्र गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. 


सम्बन्धित सामग्री