Sunday, February 09, 2025 06:07:33 PM

Mumbai
आता मुलींचे केस सुरक्षित नाहीत.. दादरमध्ये नेमकं काय घडलं?

दादर स्थानकात एका अज्ञात व्यक्तीने महाविद्यालयीन तरूणीचे केस कापून ते बॅगेत भरून पळून गेल्याची घटना घडली आहे.

आता मुलींचे केस सुरक्षित नाहीत दादरमध्ये नेमकं काय घडलं

मुंबई : आपण नेहमी अजबगजब घटना घडताना बघत असतो. अशीच एक घटना महाविद्यालयीन तरुणीसोबत घडली आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता दादर स्थानकात एका अज्ञात व्यक्तीने महाविद्यालयीन तरूणीचे केस कापून ते बॅगेत भरून पळून गेल्याची घटना घडली आहे. त्यानंतर या घटनेची तक्रार मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. रुपारेल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणीने ही तक्रार केली आहे. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही द्वारे तपास करत एका संशयीत व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्या व्यक्तीने त्या तरुणीचे केस का कापले या मागचे खरे कारण काय याचा लोहमार्ग पोलीस शोध घेत आहेत. 
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

सोमवारी एक तरुणीचे अज्ञात व्यक्तीने केस कापल्याचे समोर आले आहे. बर केस कापून हा व्यक्ती शांत बसला नाही तर त्याने ते केस बॅगेत टाकून तो तिथून पळून गेला. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र तरुणीचे केस त्याने का कापले? हे अद्याप समोर आले नाही. याचा शोध पोलिस घेत आहेत.  

हेही वाचा : एचएमपीव्हीची लहान मुले आणि प्रौढांमधील लक्षणे काय?
 

नेमकं काय झालं? 
मुंबईच्या रुपारेल कॉलेजमध्ये शिकणारी तरुणीसोबत सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एक घटना घडली. दादर स्थानकात एका व्यक्तीने या तरुणीचे केस कापले आणि ते केस बॅगेत भरून तो व्यक्ती तिथून पळून गेला. या घटनेची तक्रार तरुणीने मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिस ठाण्यात केली आहे. या घटनेची दखल घेत मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे तपास करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. परंतु त्या व्यक्तीने तरुणीचे केस का कापले ते अद्याप समोर आले नाही. या घटनेविषयी अधिकचा तपास पोलिस करत आहेत. 


सम्बन्धित सामग्री